कोणत्या Apps मुळे स्मार्टफोन हॅंग होतात ?

तुमचा स्मार्टफोन कधी हॅंग झालाय का ? फार वैताग असतो ना ? हे फोन हॅंग करण्यासाठी काही अॅप कारणीभूत ठरतात. स्मार्टफोन म्हटलं कि आपण प्लेस्टोअर वरून वेगवेगळे अॅप डाऊनलोड करून बघत असतो. त्यापैकी बरेच अॅप हे एकतर गेम अॅप असतात किंवा सोशल मीडिया, तसेच ऑनलाईन सेवा पुरवणारी असतात. आपण डोऊनलोड केलेल्या अनेक अॅपपैकी बरेच अॅप अत्यंत हेवी असतात. आणि हेच स्मार्टफोनच्या स्पीडवरही परिणाम करणारी असतात. म्हणूनच अशा प्रकारचे कोणते अॅप आहेत जे आपला स्मार्टफोन हॅंग करण्यास किंवा बॅटरी खाण्यास कारणीभूत ठरतात? बघुयात…

Candy Crush Saga

कॅंडी क्रश सागा हे एक गेमिंग अॅप आहे. तरूणाईसोबतच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकही मोठ्या प्रमाणात या अॅपची बळी ठरली आहेत. क्लासरूम, घर, ट्रेनप्रवास इतकेच नव्हे तर जागा मिळेल तेथे अनेक मंडळी Candy Crush Saga वर गेम खेळण्यात मग्न असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का हे अॅप तुमच्या फोनच्या बॅटरीवर तर परिणाम करतंच. पण, तुमच्या फोनची स्पेसही खूप खातं. त्यामुळे तुमच्या फोनचा डेटा उगाच वाया जातो.

Pet Rescue Saga

हे अॅपही वाटते तितके साधे नाही. या अॅपमुळेही तुमच्या मोबाईलची बॅटरी, स्टोरेज आणि डेटा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. याचा परिणाम मोबाईलच्या कार्यप्रणालीवर होऊन त्याचा वेग मंदावतो.

Clash of Clans

केवळ टाईमपास आणि मनोरंजन म्हणून डाऊनलोड केलेले हे अॅप खूप बॅटरी खाते. तसेच, सतत बॅटरी खान्यामुळे तुम्हाला मोबाईल चार्जीगसाठी सतत चार्जर सोबत ठेवण्यास हे अॅप प्रवृत्त करतं.

Google Play Services

प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोडचे प्रमाण मोठे आहे. हे अॅपही तुमच्या मोबाईलची बॅटरी, स्टोरेज आणि डेटा खाते. एव्हीजीनेही याबाबत दुजोरा दिला आहे.

OLX

हे एक ऑनलाईन सेवा देणारे अॅप आहे. पण, तुम्ही या अॅपच्या प्रेमात असाल तर, मोबाईलची बॅटरी, डेटा आणि स्टोरेज खर्च करण्यात तयार रहा.

Facebook

सोशल मीडियात क्रमांक एकवर असलेलेल हे अॅप तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. जगभरात कोणत्याच सोशल साईटकडे नसतील इतके यूजर्स हे अॅप यूज करतात.

WhatsApp

जास्त स्पेस खाणाऱ्या अॅपच्या यादीत व्हाट्सअॅपचे नाव पाहून कदाचीत तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, हे खरे आहे. स्मार्टफोन वापरतोय पण व्हाट्सअॅप वापरत नाही. फेसबुक प्रमाणेच हे अॅपही जास्त डेटा, स्टोरेज आणि मोबाईलची बॅटरी खाते.

Lookout Security & Antivirus

आपला स्मार्टफोन हॅंग होतोय म्हणजे त्याला व्हायरस लागला आहे, असा बहुदा अनेकांचा गैरसमज असतो. पण, तो खरा असतोच असे नाही. स्मार्टफोन हॅंग व्हायला केवळ व्हायरसच कारणीभूत असत नाही. तर, मोबाईलमध्ये असणारी अॅपही कारणीभूत असतात. त्यामुळे तुम्ही जर Lookout Security & Antivirus हे अॅप डाऊनलोड केले असेल तर त्यामुळेही मोबाईलचा डेटा आणि बॅटरी मोठ्या प्रमाणावर खर्च होते.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment