व्हॉट्सऍपचे कर्मचारी चिंतेत, भारत सरकारला पत्र !

समाजमाध्यमांचा वापर करुन पसरविल्या जाणाºया खोट्या व डोकी भडकविणाºया संदेशांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचला अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा केंद्र सरकारने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपला मंगळवारी दिला होता. सदर प्रकरणी या कंपन्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही असेही सरकारने सुनावले होते.

आम्ही आमच्या परिने प्रयत्नशील

व्हॉट्सऍपवरून अफवा पसरल्याने काही समुदायाने हिंसा केल्याने व्हॉट्सऍपच्या चालकांनी भारत सरकारला पत्र दिले आहे. भारतात व्हॉट्सऍपमुळे पसरलेल्या अफवांमुळे ज्या हिंसा झाल्या त्यामुळे व्हॉट्सऍपचे कर्मचारी चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही आमच्या परिने या अफवा व भडकाऊ संदेश कशा थांबवता येतील यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

मागच्या आठवड्यात सरकारने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. तसेच व्हॉट्सऍप कंपनी या प्रकरणात कातडी बचाव भुमिका घेऊ शकत नाही असेही सांगितले.

अफवा आणि भडकाऊ संदेश रोखण्यासाठी व्हॉट्सऍप आणि सरकारला एकत्ररित्या काम करावे लागेल असे व्हॉट्सऍपने सांगितले. यासाठी सरकार आणि सामाजिक संघटनांनी एकत्र आले पाहिजे. व्हॉट्सऍप लोकांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे म्हणून सुरक्षेला धरून या ऍपची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्था दोन नितींवर चालते. लोकांना माहिती मिळताना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकारही त्यांना दिले आहेत जेणेकरून ते सुरक्षित रहावे तसेच व्हॉट्सऍपचा दुरूपयोग होऊ नये म्हणून संस्था पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

फेक न्यूज शोधणाऱ्याला ३४ लाख रुपयांचं बक्षिस

फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हॉट्स अॅपकडून आता पावलं उचलण्यात आली आहेत. WhatsApp Research Awards द्वारे अशा फेक न्यूज शोधणाऱ्या आणि त्याबद्दल माहिती देणाऱ्याला व्हॉट्स अॅपकडून पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय त्याला ३४ लाख रुपयांचं बक्षिसही दिलं जाईल अशी घोषणा व्हॉट्स अॅपकडून करण्यात आली आहे.

पण हा पुरस्कार केवळ भारतासाठी नाही तर इतर देशांमध्येही लागू आहे. भारत, ब्राझील, इंडोनेशिया, मेक्सिको यांसारख्या देशांमध्ये जेथे व्हॉट्सअॅपचा वापर जास्त प्रमाणात आहे तेथेही हा पुरस्कार लागू होतो असं व्हॉट्स अॅपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. इंडियाटुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पुरस्कार मिळवणाऱ्या तत्ज्ञाला किंवा व्यक्तीला व्हॉट्स अॅपकडून दोन दिवसांच्या वर्कशॉपसाठीही निमंत्रण दिलं जाणार आहे. २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी कॅलिफोर्नियाच्या मेन्लो पार्कमध्ये होणाऱ्या वर्कशॉपमध्ये त्या व्यक्तीला बोलावलं जाईल. यासाठी पीएचडी झालेल्यांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत, पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा सोशल सायंसमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचेही अर्ज स्वीकारले जाऊ शकतात असंही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलं आहे. १२ ऑगस्ट २०१८ ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. WhatsApp blog येथे याबाबत आजून माहिती मिळू शकते.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment