विमानातला ब्लॅक बॉक्स काय असतो ?

लहानपणी विमान म्हटलं की आपण सगळे ते पाहायला पळत सुटायचो. आपण घरात असो, बाहेर असो किंवा खेळत असो, आपली सगळ्यांची नजर जायची वर आकाशात. विमान शोधायला. लहानपणीचे ते दिवसच वेगळे. पण कधी असा विचार केला आहे का ? की तेच विमान कधी पडू सुद्धा शकतं !

नुकत्याच झालेल्या दोन विमान अपघातांमुळे सध्या फार चर्चा आहे. दोन्ही दुर्घटना झाल्यावर सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली आहे. कालच्या मुंबईतल्या घाटकोपर भागात कोसळलेलं विमान कशामुळे पडलं असेल, असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो आहे. सध्या आपण सगळेच ब्लॅक बॉक्स असा शब्द ऐकतो आहोत. काय आहे हा ब्लॅक बॉक्स ? पाहूयात…

विमान अपघातानंतर त्यातील दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) ज्यात विमानाशी निगडित आकडेवारी दिलेली असते तर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) असते ज्याद्वारे संभाषण रोकॉर्ड केले जाते. यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात.

– ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा रंग काळा असेल असं तुम्हाला अगदी सहज वाटून जाईल. मात्र तसे नसून या बॉक्सचा रंग केशरी असतो.

– तो इतक्या कठिण गोष्टींनी बनवलेला असतो की त्याच्यावर आग आणि पाणी या कशाचाच परिणाम होत नाही.

–  हा बॉक्स सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने तो विमानाच्या मागील भागात बसवला जातो. त्यामुळे तो सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते.

– ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमताही अतिशय चांगली असून ती ३० दिवस टिकते. कित्येक त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.

– ब्लॅक बॉक्सच्या तपासणीसाठी विमान निर्माण करणाऱ्या टीमकडून त्याच्या अनेक चाचण्या केल्या जातात. या कठिण चाचण्यांमधून गेल्याननंतरच हा बॉक्स विमानाला बसविण्यात येतो.

– ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी १९५०च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत असताना कमर्शिअल एअरक्राफ्ट अपघात झाल्याने त्यांनी हा शोध लावला. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला.

– १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. तर भारतात नागरी उड्डाण संचलनालयाने जानेवारी २००५ पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये ही दोन्ही उपकरणे बसविणे अनिवार्य केले आहे.

Mumbai plane crash वैमानिक मारिया झुबेर यांच्या पतीचे गंभीर आरोप

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment