शिक्षण अर्धवट सोडून स्वतःचं अस्तित्व तयार करणारे !

आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं काय असतं तर ते म्हणजे शिक्षण. शाळेतलं शिक्षण, मग बारावी मग पदवी आणि मग नोकरी असा कित्येक जणांचा ठरलेला प्लान असतो. या प्लानवर आज कित्येकजण वर्किंग करत असतात. प्रत्येकाला आपल्याजवळ आर्थिक सुरक्षितता असावी असं सारखं वाटत असतं. कारण उद्या कधी काही होईल आणि पैश्याची गरज भासली तर काय करायचं ? असा मोठा प्रश्न प्रत्येकाच्या समोर येत असतो.

आर्थिक बाजू भक्कम करणे हे प्रत्येकासाठी कालसुद्धा गरजेचं होतं, आजसुद्धा आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे. त्यामुळे आपण कितीही नाही म्हटलं की ते पैश्याचं नंतर बघता येईल तर ते तसं दुर्लक्ष करून नाही चालत. पण मग होतं असं की ही आर्थिक बाजू भक्कम करायचं मनोमन ठरवलं जरी तरी आपल्या शिक्षणाच्या जोरावर तसं काम मिळत नाही, मिळालं तर मग तसा पगार मिळत नाही. मग प्रत्येकाची घुसमट सुरु होत असते.

पण काही माणसं असे असतात की ते हा पूर्ण मार्ग सोडून देतात आणि स्वतःचा असा एक वेगळा मार्ग तयार करतात. आज आपण असे काही माणसं पाहू ज्यांनी कॉलेजमध्ये साधी डिग्रीसुद्धा नाही घेतली पण आज त्यांचं स्वतःचं एवढं मोठं अस्तित्व आहे की त्यावरून त्यांना कोणीच हलवूसुद्धा शकत नाही.

स्टीव्ह जॉब्ज – 1972 मध्ये स्टीव्ह जॉब्सने कॉलेज सोडलं, त्यावेळी ते 19 वर्षांचे होते. यानंतर त्यांनी iPhone, iPod and Mac सारख्या नवीन उत्पादनांची निर्मिती सुरु केली.

बिल गेट्स – मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी 1975 मध्ये हार्वर्ड विद्यापीठ सोडलं. त्यावेळी बिलगेट्स फक्त 20 वर्षांचे होते. पॉल ऍलेनसह त्यांनी मायक्रोसॉफ्ट सुरू केले आणि आज त्यांची कंपनी जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे.

मार्क झुकेरबर्ग – याचं नाव खूप अल्पावधीत पूर्ण जगभरात पोहोचलं आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग. हे तर सगळ्यांना माहिती आहे की त्यानी फेसबुक तयार करायचं म्हणून हार्वर्ड विद्यापीठ अर्धवट सोडलं होतं. वयाच्या २० व्या वर्षी त्यानी शिक्षण सोडून दिलं आहे. २००४ पासून जगातली सगळ्यात मोठी सोशल मिडिया वेबसाईट म्हणून आज फेसबुकचं नाव पहिले घेतलं जातं.

जॅन कौम – आज आपण प्रत्येकजण ज्या मेसेजिंग App वर असतो ते म्हणजे Whatsapp. ते तयार केलं जॅन कौम यांनी. याहू मध्ये काम करण्यासाठी त्यांनी २१ वय वर्षी शिक्षण सोडलं. नंतर मग त्यांनी Whatsapp तयार करायला सुरुवात केली. त्याआधी ते ९ वर्ष याहू मध्ये काम करत होते.

आज दहावीचा निकाल, आयुष्याला मिळणार कलाटणी !

एसटी कर्मचाऱ्यांचा अचानक संप !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment