शरीराला आवश्यक खनिजं कोणती ?

आपल्या शरीराच्या भरणपोषणासाठी किंवा शरीर सुदृढ राहण्यासाठी शरीराला खनिजांची आवश्यकता असते असं म्हणतात. पण ही खनिजं कोणती आहेत आणि ती आपल्याला कोणत्या पदार्थामधून मिळू शकतात हे आपण जाणून घेऊ या. जेणेकरून आपला आहार संतुलित कसा असावा याची तुम्हाला कल्पना येईल.

कॅल्शिअम कशात असतं ?

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर.

कमतरतेमुळे काय होतं ?

हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे.

कार्य काय असतं ?

शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असते.

 

लोह कशात असतं ?

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी.

कमतरतेमुळे काय होतं ?

शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

कार्य काय असतं ?

शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतें.

 

सोडिअम कशात असतं ?

मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं.

कमतरतेमुळे काय होतं ?

रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.

कार्य काय असतं ?

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.

 

आयोडिन कशात असतं ?

शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.

कमतरतेमुळे काय होतं ?

थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.

कार्य काय असतं ?

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.

 

पोटॅशिअम कशात असतं ?

सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.

कमतरतेमुळे काय होतं ?

अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.

कार्य काय असतं ?

शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.

 

फॉस्फरस कशात असतं ?

दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.

कमतरतेमुळे काय होतं ?

ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.

कार्य काय असतं ?

मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.

 

सिलिकॉन कशात असतं ?

गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध.

कमतरतेमुळे काय होतं ?

कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.

कार्य काय असतं ?

जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.

मॅग्नेशिअम कशात असतं ?

बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.

कमतरतेमुळे काय होतं ?

उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

कार्य काय असतं ?

पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.

 

सल्फर कशात असतं ?

दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.

कमतरतेमुळे काय होतं ?

प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.

कार्य काय असतं ?

इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.

 

क्लोरिन कशात असतं ?

पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

कमतरतेमुळे काय होतं ?

अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.

कार्य काय असतं ?

सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.

खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.

फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.

डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.

काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.

दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.

फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment