दिल्ली: उत्तर दिल्लीच्या बुरारी येथील एका कुटुंबातील लहान मुलांसह अकरा जण मृत अवस्थेत आढळले. “मोक्ष प्राप्त” करण्यासाठी हि घटना घडली असा पोलिसांना संशय आहे.

मोक्ष प्राप्त करण्यासाठी ११ लोकांची फाशी घेऊन आत्महत्या
मोक्ष प्राप्त करण्यासाठी ११ लोकांची फाशी घेऊन आत्महत्या

वायुवीजनासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी जाळीला १० जणांनी फाशी घेतली होती. यात दोन १५ वर्षीय मुले होती. एका 77 वर्षांच्या महिलेचा मृतदेह घराच्या दुसर्या खोलीत जमिनीवर पडलेला होता असे पोलिसांनी सांगितले.

फाशी घेणाऱ्यांच्या तोंडावर टेप लावलेले होते आणि त्यांचे चेहरे एकाच चादरीच्या कापडी तुकड्यांनी झाकलेले होते. खोलीत जमिनीवर पडलेल्या वृद्ध महिलेचे डोळे उघडे होते.

पोलिसांनी सांगितले की, मुलांचे हात आणि पाय बांधलेले होते तसेच स्टूल खाली पडलेला होता. पोलिसांना हस्तलिखीत नोट मिळाली आहे, ज्यात “धार्मिक किंवा आध्यात्मिक” बाबी दर्शविल्या आहे.

एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, “हे कुटुंबियांचे” किंवा त्यांच्या “कोणत्यातरी धर्मगुरू” चे काम आहे  याचा तपास चालू आहे.

“हात आणि पाय कसे बांधायचे आहेत याचे तपशील त्या नोटमध्ये हाताने लिहिलेले आहेत. ज्या पद्धतीने नोट्समध्ये लिहीले त्याच पद्धतीने १० व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. यासंपूर्ण नोट्सचा आम्ही अभ्यास करीत आहोत.” असे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) आलोक कुमार यांनी सांगितले.

आणखी एका अधिका-याने सांगितले की या नोट्स रजिस्टर्समध्ये सापडल्या. ” एक व्यक्ती डोळे आणि तोंड बांधून भयावर कसा मात करू शकतो, कसा एक व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकतो, मानवी शरीर तात्पुरते कसे आहे परंतु आत्मा अमर राहतो” असे त्यात लिहिले आहे.

या नोट्समध्ये लिहिले आहे कि, जर ११ लोकांनी या विधी पाळल्या तर सर्व समस्या कमी होईल आणि त्यांना मोक्ष मिळतील. काही नोट्सवर तारखा आहेत तर इतरांवर नाही. सर्व नोट्समध्ये जीवन संपवणे आणि शांती मिळविण्याबद्दल चर्चाआहे ” , एक तपासकर्त्यांनी सांगितले.

हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत्युमुखी पडलेल्यांची आत्महत्या नोंदवण्यात आली आहे.

“वृद्ध महिलेला स्टूलवर चढता ना आल्यामुळे कदाचित तिची गळा दाबून हत्या करण्यात आली असेल. लहान मुलांना मारण्यात आले कि त्यांना फाशी घेण्यास मानसिकरित्या तयार करण्यात आले ? याचा तपास चालू आहे.” एका अधिकाऱ्याने चौकशी दरम्यान सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा ते सात जणांनी आत्महत्या केल्याची त्यांच्या शेजार्यांनी माहिती दिली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे ११ जणांचा मृत्यू झाला होता.

मृतकांची नावे नारायण देवी, त्यांची मुलगी प्रतिभा (57), भावनेश (50) आणि ललित भाटिया (45) यांच्यावर झाली. भावनेशची पत्नी सविता (48) आणि तिन्ही मुले – मीनू (23), निधी (25) आणि ध्रुव (15). ललित भाटियाची पत्नी टीना (42) आणि त्यांचे 15 वर्षीय मुलगा शिवम हे मृतदेह सापडले आहेत.

प्रतिभाची मुलगी प्रियांका (33), गेल्या महिन्यात तिचे साक्षगंध झाले  होते आणि या वर्षाच्या अखेरीस लग्न होते, तिलाही फाशी देण्यात आली.

भावनेश घराखालीच किराणा दुकानावर चालत होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो दुकान उघदयाचा, असे शेजारी अम्रिक सिंह यांनी सांगितले.

“आज  7 पर्यंत दुकान उघडले गेले नाही. दुकानाच्या बाहेर दूधाची गाडी आली होती. बरेच शेजारी जमले होते कारण वाहन चालक सतत होर्न वाजवत होता.” असे अमरीक सिंहचे वडील गुरचरण सिंग यांनी सांगितले. प्रथम मृतदेह त्यांनीच पहिले होते.

 

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment