अंदाज शेअर मार्केटचा !

प्रत्येक गुंतवणूकदारावर विविध स्रोतांमधून माहितीचा अक्षरशः भडीमार होत असतो. आतापर्यंत सगळ्यांना हे कळलंय की तेलाचे भाव वाढून प्रती बॅरल ७०-७५ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. रुपया नरमला आहे आणि चालू खात्यावरील तूट वाढते आहे. या सर्व नकारात्मक गोष्टी आहेत.

परकी गुंतवणूकदार शेअर आणि बॉंड मार्केटमध्ये विक्री करत आहेत. याच्या बरोबरीने एसआयपीद्वारे होणारी देशांतर्गत गुंतवणूक वाढत आहे. हे जरी खरं असलं तरी कोणीतरी कच खाणार हे नक्की ! व्याजदर वाढण्याचीही शक्यता आहे, तर रिझर्व बँकेने बॉंड मार्केटला ‘थंड’ करण्यासाठी १०००० कोटींचे बॉंड विकत घेण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा घेऊन परकीय गुंतवणूकदर आपली विक्री वाढविणार नाहीत अशी आशा करूया !

इंडेक्सने ३६४४३ चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता तेव्हा मार्केट कॅपिटलायझेशन १५५००० कोटींचं होतं. आज ते १५०००० कोटींवर पोहोचलं आहे. याचाच अर्थ असा की आपण सर्वोच्च पातळीच्या अगदी जवळ आहोत.

बाजार आता जास्तीत जास्त २०० ते ३५० पॉईंट्स वर जाऊ शकेल आणि ही शक्यताही फक्त ३० टक्केच आहे. अमेरिका – इराण तणाव निवळणे, तेलाच्या किमती कमी होणे यासारखी काही चांगली बातमी आली तर गोष्ट वेगळी. अन्यथा बाजारात आता अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकायला हवीत.

याशिवाय कर्नाटक निवडणुकांचा विषय ध्यानात घ्यायलाच हवा. सोपा हिशोब असा, की भाजपाने जर कर्नाटक जिंकलं तर बाजार वर जाईल. त्यावेळी विकून पैसे गोळा करा. भाजपा हारली तर बाजार बऱ्याच काळापासून असलेल्या अपेक्षेनुसार खाली येईल, अशावेळी आयटी स्टॉक्सकडे लक्ष असुदेत. ‘पीई’ १५ असेल तेव्हा विकत घ्या आणि २२ झाला की विकून टाका. अपवाद फक्त सुपरस्टार श्रेणीतील टीसीएसचा. या शेअरमध्ये ‘करेक्शन’ येण्याची शक्यता आहे.

थोडक्यात काय, तर सध्या अत्यंत विचारपूर्वक मोजक्या शेअर्सचा विचार करणंच योग्य ठरेल !

यशस्वी गुंतवणुकीसाठी शुभेच्छा !

  • भूषण महाजन

( लेखक ‘अर्थबोध’ या गुंतवणूक सल्लागार समितीचे प्रमुख आहेत. )

बॉलीवूडची मसक्कली सोनम कपूर आज विवाहबंधनात !

आयपीएल : आज राजस्थान रॉयल्सची कसोटी !

फेसबुकसाठी आता पैसे मोजावे लागणार ?

सरकारने काढला मराठी सक्तीचा आदेश !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment