जीमेल अकाऊंट सुरक्षित ठेवा !

सध्या टेक्नॉलॉजी म्हणजे असून त्रास नसून खोळंबा असं झालं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या टेक्नॉलॉजी फार मोठ्या प्रमाणावर महत्व निर्माण झालं आहे. सोशल मिडियाने तर प्रत्येकाचं रोजचं जगणं अगदी व्यापून टाकलं आहे. याशिवाय आपण राहू शकतो असा विचारसुद्धा आता कोणाच्या डोक्यात येत नसेल. ही टेक्नॉलॉजी जेवढी चांगली आहे तेवढीच त्रासदायक आहे. आपण सगळेच ई मेल अकाऊंट वापरत असतो. जास्त प्रमाण आहे ते जीमेल वापरण्याचं. आज बघुयात हेच जीमेल अकाऊंट सुरक्षित ठेवण्याबद्दल.

आपले जीमेल अकाऊंट सुरक्षीतपणे वापरण्याचे टुल गुगलने उपलब्ध करून दिले असून याच्या मदतीने कुणीही धोकेदायक थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सच्या त्रासापासून सहजपणे मुक्ती मिळवू शकतो.

जीमेल अकाऊंट सुरक्षीत नसल्याची बाब अलीकडेच उघडकीस आली आहे. विशेष करून अनेक त्रयस्थ अर्थात थर्ड पार्टी अ‍ॅप्स हे जीमेल अकाऊंटमध्ये डोकावून पाहत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने नुकताच हा दावा केला आहे. यानुसार अनेक सेवांसाठी आपले ई-मेल अथवा सोशल प्रोफाईल वापरून लॉगीन करण्याची सुविधा दिलेली असते. या अनुषंगाने जी-मेलचा वापर करून असंख्य त्रयस्थ (थर्ड-पार्टी) सेवेसाठी लॉगीन करता येते. मात्र हे लॉगीन करतांना त्यांना संबंधीत युजरचा इनबॉक्स चेक करण्याची परमीशन दिली जाते. यामुळे ते डेव्हलपर्स सहजपणे संबंधीत युजर्सचा इनबॉक्समध्ये डोकावून पाहू शकतात. या वृत्तानंतर सुरक्षीत जीमेल वापराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावर गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून आपण आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा दावा केला आहे. अर्थात असे असले तरी थर्ड पार्टी अ‍ॅप्सपासूनचा धोका टाळणे जिकरीचे असल्याची बाब स्पष्ट आहे. गुगलने आधीच दिलेल्या टुलच्या मदतीने जीमेल सुरक्षीत वापरणे शक्य आहे. अर्थात, यासाठी आपल्याला खाली स्टेप्सचा अवलंब करावा लागेल.

स्टेप्स

१) जीमेलच्या परमीशन्सची माहिती :- आपण जीमेलचा वापर करून विविध सेवांसाठी लॉगीन केलेले असते. मात्र आपल्याला याची नेमकी माहिती राहत नाही. यामुळे सुरक्षिततेसाठी पहिल्यांदा ही माहिती मिळवणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला https://myaccount.google.com/permissions या युआरएलला व्हिजीट करावी लागेल. येथे आपण आपल्या जीमेल अकाऊंटचा वापर करून कोणत्या थर्ड पार्टीजवर लॉगीन केलेय याची अचूक माहिती मिळू शकते. येथून आपण धोकेदायक वाटणार्‍या लॉगीन्सच्या सेवा खंडीत करू शकतो.

२) गुगलचे सिक्युरिटी चेक-अप पेज : कुणीही युजर https://myaccount.google.com/security-checkup या युआरएलवर क्लिक करून या पेजला भेट देऊ शकतात. येथे संबंधीत युजरने कोणत्या उपकरणांवरून जीमेलचा वापर केलाय ? किती अ‍ॅप्स वा थर्ड पार्टी सेवांसाठी जीमेलचे लॉगीन केलेय ? याची माहिती मिळू शकते.

३) अ‍ॅक्सेस रिमूव्हल : याच पेजच्या खालील बाजूस थर्ड पार्टी अ‍ॅक्सेसबाबत विवरण दिलेले असते. यात आपण कोणत्या सेवेसाठी अ‍ॅक्सेसची परवानगी दिलीय ? आणि यातील नेमकी जोखीम काय आहे? याबाबत माहिती दिलेली असते. येथून आपण हव्या त्या अ‍ॅप वा सेवेचा अ‍ॅक्सेस रिमूव्ह करू शकतो.

या माध्यमातून थर्ड पार्टी सेवांपैकी धोकेदायक बाबींना हटवून सुरक्षीत जीमेल वापरणे शक्य आहे.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment