‘संजू’ २०१८ मधला सगळ्यात जास्त ओपनिंग मिळवणारा सिनेमा !

संजय दत्तच्या आयुष्यावरील सिनेमा ‘संजू’, याने २०१८ मधल्या सगळ्यात मोठ्या ओपनिंगवर आपले नाव कोरले आहे. २०१८ मधल्या सगळ्या सिनेमांना ‘संजू’ने मागे टाकले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 34.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे.

२०१८ वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘संजू’ने सलमान खानचा ‘रेस 3’, टायगर श्रॉफचा ‘बागी 2’ आणि दीपिका-रणवीरच्या ‘पद्मावत’ या चित्रपटांना मागे टाकलं.

‘संजू’ संजय दत्तसाठी आणि रणबीर कपूरसाठी !

‘संजू’ प्रदर्शित होण्यापूर्वीच तो लोकप्रिय झाला असून या चित्रपटाच्या ट्रेलर,टिझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

बरेच फ्लॉप चित्रपट झाल्यानंतर आता ‘संजू’ हा चित्रपट रणबीरच्या करिअरसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या चित्रपटाच्या यशानं रणबीरच्या करिअरला नक्कीच कलाटणी मिळेल. पण यासाठी त्यानं २०० कोटींचा गल्ला पार करणं महत्त्वाचं आहे असं मत व्यक्त केलं जात आहे.

कसा आहे सिनेमा ?

‘संजू’ सुपरडुपर हिट मानला जात आहे. रणबीरचं नाही तर संजयच्या मित्राच्या भूमिकेतील विकी कौशल, संजयच्या आईच्या भूमिकेतील मनीषा कोईराला, सुनीत दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल इथपासून तर अनुष्का शर्मा, दिया मिर्झा असे सगळेच आपआपल्या भूमिकेत जीव ओततात. ‘संजू’मधील प्रत्येक पात्राने आपल्या वाट्याला आलेल्या छोट्यात छोट्या भूमिकेलाही न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे ‘संजू’ अधिक उठून येतो. अर्थात रणबीर कपूर सर्वांवर भारी पडतो. त्याच्या अभिनयाला तोड नाही, असेच म्हणता येईल. चित्रपटाचे संगीत कथेला पुढे नेण्यास मदत करते आणि रणबीरचा जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो.

एकंदरीत हा सिनेमा संजय दत्तसाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच, किंबहुना त्याहून जास्त महत्वाचा ठरणार आहे. या सिनेमावरून रणबीर कपूरच्या करिअरवर एक वेगळाच परिणाम होणार आहे.

संजयच्या मित्राच्या भूमिकेतील विकी कौशल, संजयच्या आईच्या भूमिकेतील मनीषा कोईराला, सुनीत दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल इथपासून तर अनुष्का शर्मा, दिया मिर्झा असे सगळेच जबरदस्त परफॉर्मन्समध्ये आहेत.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment