अशांतता निर्माण करण्यात विरोधकांना रस – पंतप्रधान मोदी

देशात सुरु असलेलं राजकारण आणि विरोधी पक्ष यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील असमानता दूर करण्यासाठी आपपाल्यापरीने प्रयत्न केले. बाबासाहेबांनी तर देशाला संविधान दिले, सर्वांना बरोबरीचा अधिकार दिला. पण सध्या आपल्या देशात महापुरुषांच्या नावावरुन राजकारण सुरु असून समाजाला तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील मगहर येथे संत कबीर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशात आज असे काही पक्ष आहेत ज्यांना शांतता आणि विकास नको असून अशांतता हवी आहे. देशात अशांतता राहिली तर आपला फायदा होईल असे त्यांना वाटते. या लोकांना आपल्या देशाचा स्वभाव ठाकाऊ नाही असे मोदी म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी देशात आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण झाली. ज्यांनी देशाता आणीबाणी लागू केली आणि ज्यांनी विरोध केला ते आज एकत्र आहेत. त्यातून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते असे मोदी म्हणाले. त्यांना देशाचे कल्याण दिसत नाही फक्त स्वत:चे आणि कुटुंबाचे भले दिसते असे मोदी म्हणाले.

मगहर येथे पोहोचल्यानंतर मोदी यांनी संत कबीर यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. संत कबीर यांची आज ६२० वी पुण्यतिथी आहे. मोदींनी आपल्या भाषणातून संत कबीरांच्या कार्याचे गुणगान करताना त्यांनी समाजाला कशी दिशा दिली ते समजावून सांगितले. कबीरांना समजून घेण्यासाठी कुठल्या शब्दकोषाची गरज नाहीय. त्यांची तुमच्या-आमच्यासारखीच सोपी भाषा होती असे मोदी म्हणाले.

मुंबईत कॉंग्रेसवर हल्लाबोल

मुंबईत भाजपाने आयोजित केलेल्या आणीबाणीविरोधी दिनानिमित्त कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. तेव्हा त्यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. एकेकाळी संपूर्ण देशाला तुरुंगशाळा करणारेच आता मोदी आणि आरएसएसच्या नावाने जनतेला घाबरवण्याचे काम करत आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा केली. एका कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला. स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे केले. आणीबाणी आणि महाभियोग ही कॉंग्रसची मानसिकता असून काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात आली, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा : मुख्यमंत्री

यूजीसी रद्द, नव्या आयोगाची स्थापना !

आजपासून किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी प्लास्टिकबंदी उठवली !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment