नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा : मुख्यमंत्री

सध्या रत्नागिरी फार मोठ्या चर्चेत आहे ते म्हणजे तिथे होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पामुळे. कोणी म्हणतंय हा प्रकल्प नको आहे तर कोणी म्हणतंय हा प्रकल्प हवा आहे. अशा वादात सध्या हा प्रकल्प चर्चेत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या आहेत. त्यामुळे सरकार हा प्रकल्प रेटून नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निश्चित झाले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

“मी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. सगळ्यात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आणत आहेत. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मला वाटते नाणार रिफाईनरी होणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. काही लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत, पण तो विरोध चर्चा करून सोडवू, संघर्ष नाही तर संवादाच्या माध्यमातून विषय संपवावे ही आमची भूमिका आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काय आहे नाणार प्रकल्प ?

खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार आहे. जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय. ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे. प्रति दिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल.

या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार. रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार आहे.

प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्य

जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प. जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना.
वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता. पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी. दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी.

भारतात एवढी मोठी गुंतवणूक कशामुळे ?

इतर तेल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच एडनॉक आणि सौदी अरामकोलाही भारतात आपली पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते. 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली आहे.

यूजीसी रद्द, नव्या आयोगाची स्थापना !

आजपासून किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी प्लास्टिकबंदी उठवली !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment