शरद पवार यांनी परत एकदा मोदींच्या परिवारावर निशाणा साधला. त्यांनी मोदींचा कोणता परिवार आहे कि नाही असा प्रश्न केला होता.

महाराष्ट्रातील माढा येथील जनसभा संबोधित करताना मोदी म्हणाले,” परिवार व्यवस्ता ही हजार वर्षापासून भारताची विशेषता आहे. परिवार व्यवस्ता ही भारताची ताकद आहे, भारताचा गौरव आहे आणि संपूर्ण विश्वाला ही सर्वात मोठी देण आहे. शरद परावांना माझ्या परिवाराबद्दल बोलण्याचा हक्क आहे कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत.”

पंतप्रधान मोदींनी पवारांच्या संस्कार आणि समज यावर टिपणी केली.

modi rally in madha
modi rally in madha

“मी सध्या जे आयुष्य जगतोय ते परीवारांकडून प्रेरणा घेऊनच जगतोय. भगत सिंघ, सुखदेव यांचा एक मोठा परिवार होता आणि हीच माझी प्रेरणा आहे. राजगुरूंचा सुद्धा एक विस्तृत परिवार होता आणि हीच माझी प्रेरणा आहे. चाफेकर बंधू, महात्मा फुले यांचा सुद्धा एक विशाल परिवार होता आणि हीच माझी प्रेरणा आहे. महात्मा फुले, सरदार वल्लभभाई पटेल यांचा सुद्धा मोठा परिवार होता आणि ही माझी प्रेरणा आहे. परिवारांच्या त्याग , तपस्येतून मी प्रेरणा घेतली आहे.” असे मोदी म्हणाले.

शरद पवारांनी त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घेतली असती तर त्यांना कळले असते कि परिवारांची भूमिका काय असते. माझ्या मार्गावर चालणे शरद पवारांना नाही जमणार , तेवढी त्यांच्यात ताकद नाही. ज्या परिवारांनी देशासाठी सर्वकाही गमावले त्यांच्याकडून पवारांनी काही शिकावे. ” पवारांचे मोडेल म्हणजे दिल्लीचा एक परिवार आहे. पवार त्यांच्याकडूनच शिकतात आणि त्यांच्यासाठीच काम करतात” असे मोदी म्हणाले.

 

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment