‘महाभारत’मध्ये नाही, तर ओशो म्हणून दिसणार आमीर खान ?

बॉलिवूडमध्ये सध्या मोठ्यामोठ्या चर्चेत नाव आहे ते ‘महाभारत’ या प्रोजेक्टचं. हा सिनेमा कधी येणार आहे हे अजून तरी कळलेलं नाहीये. आमीर खानच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा आणि ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्यानी तो रद्द केला आहे. पण आता पुढे काय असेल ? आमीर खानचं नवीन काम काय असेल ? अशी जर तुम्हाला उत्सुकता असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान जे काही करतो, ते पूर्ण परफेक्शनसह करतो. सध्या बॉलिवूडचा हा खान आपल्या ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण आमिरबद्दल एक नवी चर्चाही आहे. होय, आमिर ओशो बनणार आहे. आपल्या पुढील प्रोजेक्टमध्ये आमिर खान आचार्य रजनीश अर्थात ओशोची भूमिका साकारताना दिसू शकतो.

आमिरसोबत या चित्रपटात आलिया भट्टही दिसू शकते. अर्थात अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. तूर्तास केवळ शकुन बत्रा यांनी याबद्दल आमिरशी चर्चा केल्याचे कळते.  ओशोंच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाचे शूटींग यावर्षअखेरिस सुरू होईल, अशी शक्यता आहे आणि आमिरनेही या प्रोजेक्टला होकार दिल्याचे कळते.

आधी हा प्रोजेक्ट नेटफ्लिक्ससाठी बनवला जाणार होता. पण आता यावर एक पूर्ण चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसाही आमिर आपल्या आगामी चित्रपटांबद्दल बोलणे टाळतो़. सगळे काही मार्गी लागल्यानंतरच म्हणजेचं योग्य वेळ आल्यानंतरचं तो बोलतो. या प्रोजेक्टबद्दलही आमिर काहीही बोललेला नाही. त्यामुळे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’नंतर आमिर कुठला प्रोजेक्ट हाती घेतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. आमिर ओशोच्या भूमिकेत दिसणार असेल तर चाहत्यांसाठी यापेक्षा मोठे सरप्राईज कुठले असूच शकत नाही.

खरे तर पडद्यावर कृष्णाची भूमिका साकारणे हे आमिरचे स्वप्न होते. पण अलीकडे आमिरचे हे स्वप्न भंगले. होय, ‘महाभारत’ हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आमिरने तूर्तास रद्द केला आहे.

आता मोबाईल App वरून पासपोर्ट अर्ज !

मोबाईल पोर्टीबिलिटीची सुविधा बंद होणार ?

देशाला तुरुंगशाळा करणारेच जनतेला घाबरवण्याचे काम करत आहेत : मोदी

संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही : मोदी

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment