२०२३ पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक !

क्रिकेट म्हटलं की भारतीयांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असते. नुकतंच आयपीएल संपलं आणि आता पुढं काय ? असा प्रश्न जर पडला असेल तर मग हे घ्या, पुढच्या पाच वर्षांचं भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक आलं आहे.

आयसीसीने काल जुलै २०१९ ते मार्च २०२३ या पाच वर्षांचा फ्यूचर टूर प्रोग्राम जाहीर केला. यामध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वन-डे लीग अशा स्पर्धांचीही घोषणा करण्यात आली आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत क्रमवारीतले सर्वोत्तम ९ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे आगामी ५ वर्षात भारतीय क्रिकेटप्रेमींना भरघोस मनोरंजन मिळेल याची खात्री आहे.

 

भारताचं घरच्या मैदानावरील कसोटी सामन्यांचं वेळापत्रक

ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१९  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ तर बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका

जानेवारी ते मार्च २०२१  इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका

नोव्हेंबर २०२१  न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका

फेब्रुवारी २०२२  श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका

ऑक्टोबर २०२२  ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका

 

बाहेरच्या मैदानांवरील भारतीय संघाचे कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

जुलै २०१९  वेस्ट इंडिज विरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका

फेब्रुवारी २०२०  न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका

नोव्हेंबर ते डिसेंबर २०२०  ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका

जून ते ऑगस्ट २०२१  इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका

डिसेंबर २०२१  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका

नोव्हेंबर २०२२  बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका

 

घरच्या मैदानावर भारताचे मर्यादीत षटकांच्या सामन्यांचे वेळापत्रक

नोव्हेंबर २०१९  बांगलादेशविरुद्ध दोन टी-२०

डिसेंबर २०१९  वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२०

जानेवारी २०२०  ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका

मार्च २०२०  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका

सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२०  इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका

मार्च २०२१  अफगाणिस्तानविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका

ऑक्टोबर २०२१  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका

नोव्हेंबर ते डिसेंबर २०२१  न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका

फेब्रुवारी २०२२  वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका, श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका

ऑक्टोबर २०२२  ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका

डिसेंबर २०२२  श्रीलंकेविरुद्ध ५ वन-डे सामन्यांची मालिका

जानेवारी ते फेब्रुवारी २०२३  न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका

फेब्रुवारी ते मार्च २०२३  आयसीसी विश्वचषक

 

भारताचे बाहेरच्या मैदानावरील मर्यादीत षटकांच्या सामन्याचे वेळापत्रक

जुलै ते ऑगस्ट २०१९  वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका

फेब्रुवारी ते मार्च २०२०  न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका

जुलै २०२०  श्रीलंकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका

ऑगस्ट २०२०  झिम्बाब्वेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका

ऑक्टोबर २०२०  ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका

ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२०  ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक

नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१  ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका

जुलै २०२१  श्रीलंकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका

डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका

मार्च २०२२  न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका

जुलै २०२२  इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका

ऑगस्ट २०२२  वेस्ट इंडिजविरुद्ध ३ टी-२० व ३ वन-डे सामन्यांची मालिका

नोव्हेंबर २०२२  बांगलादेशविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका.

नव्या कंपनीसाठी अॅमेझॉन, वॉरेन बफे व जेपी मॉर्गन हे मराठी माणसाला नियुक्त करणार !

खासगी शाळातील शिक्षक भरतीसुद्धा राज्य सरकार करणार !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment