भारताच्या इतिहासात सर्वात मोठा ‘टी20 विजय’

भारयीय संघ हा सध्या आयर्लंडमध्ये टी२० मालिका खेळत आहे. हि मालिका २ सामन्यांची आहे. त्यापैकी पहिला सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला आहे. डब्लिनच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताने यजमान आयर्लंडचा 143 धावांनी धुव्वा उडवला. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या इतिहासात हा आजवरचा दुसरा मोठा विजय ठरला. भारताच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येच्या फरकाने जिंकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.

टीम इंडियानं दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव अवघ्या 70 धावांत संपुष्टात आला. भारताकडून कुलदीप यादवनं 16 धावांत तीन आणि यजुवेंद्र चहलनं 21 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. याशिवाय उमेश यादवनं दोन तर सिद्धार्थ कौल आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतली.

सलामीवीर लोकेश राहुल आणि सुरेश रैनाच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं आयर्लंडसमोर 213 धावांचा डोंगर उभारला. शिखर धवनच्या जागी संधी मिळवलेल्या लोकेश राहुलनं 36 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकार ठोकत 70 धावांची खेळी केली. रैनाने 45 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 69 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे टीम इंडियाला 20 षटकांत चार बाद 213 धावांची मजल मारता आली. कर्णधार विराट कोहली मात्र या सामन्यात केवळ 9 धावा काढून माघारी परतला.

भारताच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येच्या फरकाने जिंकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. यापूर्वी 2017 साली कटकमध्ये भारताने श्रीलंकेवर 93 धावांनी विजय मिळवला होता. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या इतिहासात हा आजवरचा दुसरा (विभागून) मोठा विजय ठरला. याच वर्षी कराचीत झालेल्या टी20 सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिज 143 धावांनी धुव्वा उडवला होता. 2007 मध्ये श्रीलंकेने केनियावर 172 धावांनी मिळवलेला विजय हा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय आहे.

उमेश यादवचा विक्रम

उमेश यादव हा आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन टी२० सामन्यांत सर्वाधिक अंतर राखलेला भारतीय खेळाडू ठरला आहे.३० वर्षीय उमेश यादवने या आधी ७ ऑगस्ट, २०१२ रोजी टी २० सामना खेळला होता. त्यांनतर तब्बल ६ वर्षांनी त्याला भारताकडून टी२० सामना खेळण्याची संधी लाभली. या दरम्यान उमेश यादवला तब्बल ६५ सामन्यांना मुकावे लागले. या कामगिरीबरोबरच उमेशने दिनेश कार्तिकचा विक्रम मोडीत काढला आहे. दिनेश कार्तिक ५६ सामन्यांना मुकला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले होते.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment