अफगाणिस्तान-भारत कसोटी, अफगाणिस्तानची पहिलीच कसोटी !

आज क्रिकेट विश्वात एक वेगळीच गोष्ट घडत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज कसोटी होत आहे, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये. आता यात विशेष काय आहे असं म्हणाल तर विशेष अर्थात आहे, कारण आज होती आहे अफगाणिस्तानची पहिली कसोटी !

असगर स्टॅनिकझाईचा अफगाणिस्तान संघ अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाशी खेळून कसोटी क्रिकेटमधलं आपलं पदार्पण साजरं केलं. भारत आणि अफगाणिस्तान संघांमधल्या या एकमेव कसोटीला आजपासून चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे.

आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया नंबर वन आहे, तर युद्धग्रस्त अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटच्या दुनियेत सुरुवातीची पावलं टाकत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अफगाणिस्तान हा 12 वा देश आहे. आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल. राशिदसह मुजीब जादरान आणि मोहम्मद शहजाद हे खेळाडूही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.

शिखर धवनचा विक्रम !

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी खणखणीत शतक झळकावलं, उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा जगातील सहावा, तर पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने अवघ्या 87 बॉलमध्ये शतक झळकावलं आहे.

उपहारापूर्वी भारताने 27 षटकात बिनबाद 158 धावा केल्या होत्या. मुरली विजय 72 चेंडूत नाबाद 41 तर शिखर धवन 91 चेंडूत 104 धावांवर खेळत होता.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल, करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव.

अफगाणिस्तान : अशगर स्टेनिकजई, मोहम्मद शहजादस जावेद अहमदी, रहमत शाह, एहसानुल्लाह जनात, नासीर जमाल, हशमतुल्ला शाहिदी, अफसर जजाई, मोहम्मद नबी, राशिद खान, जहीर खान, अमीर हमजा होताक, सैयद अहमद शिरजाद, यामिन अहमदजई वफादार, मुजीब उर-रहमान.

पहिल्या कसोटीसाठी मोदींच्या शुभेच्छा !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले संबंध अधिक मजबूत होतील अशी आशा मोदी यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. नाणेफेकीनंतर मैदानात पार पडलेल्या सोहळ्यात भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोडही उपस्थित होते. त्यांनीही अफगाणिस्तानच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

फेसबुकची नजर तुमच्या प्रत्येक क्लिकवर !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment