आजपासून किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी प्लास्टिकबंदी उठवली !

महाराष्ट्र राज्यात प्लास्टिकबंदी झाली आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. राज्यातच काय तर सगळीकडेच प्लास्टिक ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एवढी महत्वाची गोष्ट झाली आहे की त्याला पर्याय शोधणं म्हणजे मुश्कील गोष्ट. Carry bag ज्या आहेत, त्यांना पर्याय आहेच, पण तो तितक्या प्रमाणात बाजारात उपलब्ध नाही आणि असला जरी तो आज प्रत्येक माणसाकडे उपलब्ध नाही.

नुकतीच महाराष्ट्र राज्यात प्लास्टिकबंदी करण्यात आली होती. पण आता ती काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे. किराणा दुकानदारांची मोठी अडचण झाल्याकारणाने यावर फेरविचार करण्यात आला आहे. ही अडचण लक्षात घेता, पाव किलोपासून पुढील वजनाच्या किराणा मालासाठी प्लास्टिक पॅकिंगसाठी सशर्त परवानागी देण्यात आली आहे. त्यामुळे किराणा दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी याची घोषणा केली. आजपासून ही बंदी उठवण्यात येणार आहे.

मालाच्या पॅकिंगसाठी सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानुसार, किराणा माल प्लास्टिक पिशव्यांमधून सुट्या पद्धतीने न देता मालाची पॅकिंग करुनच दुकानदारांना आपला किराणा माल विकावा लागणार आहे.

या पॅकिंगवर प्लास्टिकचे मायक्रॉन, पॅकिंगची तारीख यांसारख्या गोष्टी छापाव्या लागणार आहेत. तसेच दुध पिशव्यांप्रमाणे हे प्लास्टिंकचे पॅकिंग ग्राहकांकडून पुन्हा मागवून घेऊन त्याचा पुनर्वापर कसा करणार याची माहितीही दुकानदारांना द्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टींचे दुकानदारांच्या प्रतिनिधींनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी ही परवानगी देण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व प्रकारच्या किराणा मालासाठी ही बंदी उठवण्यात आली असून इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांसाठी मात्र ही प्लास्टिक बंदी कायम राहणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांनाही प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी कायम असणार आहे.

ग्राहकाकडून पिशव्या परत करण्याची जबाबदारी दुकानदारांसाठी असणार असून या पिशव्या परत करताना त्यांना ५० पैशांपासून सूट देण्याची जबाबदारीही दुकानदारांवरच राहणार आहे. यापूर्वी मोठ्या उत्पादकांना सूट दिली होती ती आता सर्व किराणा दुकानदारांसाठी देण्यात आली आहे.

अटी-शर्तींसह बंदी उठवण्यात येणार असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.

काय आहेत अटी ?

किरकोळ दुकानदारांनी आणि उत्पादकांनी उत्पादीत प्लास्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी

पॅकेजिंगवर उत्पादकाचं नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा

उत्पादकांनी रिसायकल प्लांट्स आणि कलेक्शन सेंटर्स उभारावेत.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment

1 COMMENT