FIFA World Cup 2018 : आज रंगणार खरा थरार, स्पेन विरुद्ध पोर्तुगाल !

आयपीएलचा थरार संपल्यावर आता फिफाचा थरार सुरु झाला आहे. काल फुटबॉल वर्ल्डकपचा थरार सुरु झाला आहे. काल जरी सुरु झाला असला तरी सगळ्या चाहत्यांचं लक्ष आजच्या सामन्यावर असणार आहे. कारण आज स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यात लढत होणार आहे. जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना सलामीच्याच लढतीत एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी म्हणजे पवर्णीच.

ख्रिस्तियानो रोनाल्डो या एकखांबी तंबूवर पोर्तुगालची मदार आहे, तर स्पेनकडे मातब्बर खेळाडूंची अख्खी फौज आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी फुटबॉलप्रेमी उत्सुक आहे. हा सामना  भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता सोनी टेन 2, सोनी टेन 3 वर दाखवण्यात येणार आहे.

जगभरात सध्या FIFA वर्ल्डकपचा फिव्हर पाहायला मिळतोय. रशियातील मॉस्को शहरात गुरूवारी FIFA वर्ल्डकपचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर यजमान रशिया आणि सौदी अरेबियातील सलामीच्या सामन्यानं यंदाच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली. त्यात रशियानं बाजी मारली.

यंदा 32 संघ एकमेकांसमोर आमनेसामने ठाकले असून विजेतेपदासाठी प्रत्येक संघ कडवा संघर्ष करताना पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील महिनाभर जगभरातील कोट्यावधी फुटबॉल चाहत्यांना सर्वोत्तम खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

कालचा सामना

रशियानं पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपली दमदार सुरुवात केली आहे. सामन्याच्या सुरुवातीची 10 मिनिटे सौदी अरेबियानं दमदार खेळ केला. पण सामन्याच्या 12व्या मिनिटाला युरी गॉसिन्सकीनं रशियासाठी पहिला गोल केला. सामन्याच्या 43व्या मिनिटाला डेनिस चेरीशेवनं रशियासाठी दुसरा गोल केला.

सामन्याच्या 91 व्या मिनिटालाही डेनिसनं अजून एक गोल करत संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर रशियाच्या आट्रेम डीयुबा आणि गोलोव्हिन यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आतापर्यंत फुटबॉल विश्वचषकातील यजमानांनी एकही सामना गमावलेला नाही, रशियानं ही 88 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.

अतिक्रमण करणाऱ्यांना राज्य सरकार देणार मोफत घर आणि रोख रक्कम !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment