तुमची एक फेसबुक पोस्ट सांगू शकते तुमची मानसिक स्थिती !

फेसबुक आपण सगळेच वापरतो. लॉग इन केल्या केल्या आपल्या समोर एक मेसेज येतो तो म्हणजे तुमच्या मनात काय आहे ? थोडक्यात स्टेटस टाकायला, व्हिडिओ टाकायला हे आधीच विचारलेलं असतं आणि खरंच आपल्या मनात जे आहे ते आपण इथे टाकत असतो. आपल्या जे आवडतं आहे ते आपण शेअर करत असतो.

व्हॉट इज इन युवर माइंड ? तुमच्या मनात काय चाललंय ? जगभरातल्या 1.7 अब्ज फेसबुक युझर्सच्या फेसबुक अकाउंटवर हा प्रश्न रोज दिसतो. आपल्या मानसिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, कौन्सिलर हेही हाच प्रश्न आपल्याला विचारत असतात. आपले कुटुंबीय, मित्र संकटात असताना आपण त्यांना हाच प्रश्न विचारतो.

सोशल मीडियावर आपण जे पोस्ट करतो ते आपल्या मानसिक स्थितीबद्दल बरंच काही सांगून जातं आणि याची मदत आता मानसोपचार तज्ज्ञसुद्धा घेतायत. आपलं मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य नेमकं कसं आहे याचा अंदाज सोशल मीडियाच्या पोस्टवरून हे मानसोपचारतज्ज्ञ बांधू शकतात.

स्वतंत्र व्यक्ती, समाज, देश आणि एकूण जगभरातली माणसंच नेमका कसा विचार करतायत, याच्याबद्दलचे काही ठोकताळे यामुळे बांधता येऊ शकतात.अमेरिकेमध्ये 555 फेसबुक युझर्सचं एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यातून काही मनोरंजक निष्कर्ष निघालेत.

तुमची सोशल मीडिया पोस्ट काय सांगते ?

– समाजामध्ये मिसळणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांबद्दल, उपक्रमांबद्दल पोस्ट करतात.

– कमी आत्मविश्‍वास असलेले लोक त्यांच्या पार्टनरबद्दल बोलत राहतात.

– अशांत मनोवृत्तीचे लोक इतरांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात.

– स्वत:ला महत्त्व हवं असणारे लोक त्यांच्या छोट्याछोट्या अचिव्हमेंट्सबद्दल स्टेटस अपडेट करत राहतात.

– जे लोक फेसबुकवर जास्तीत जास्त सेल्फी अपलोड करतात त्यांना इतरांनी आपल्याला सारखं महत्त्व द्यावंसं वाटतं.

सोशल मीडियावर पोस्ट टाकणं ही मानसिक उपचारपद्धती असू शकते का ?

सोशल मीडिया वापरत नाहीत त्यांचं काय ?

अमेरिकेमध्ये सोशल मीडिया न वापरणा•यांचंही सर्वेक्षण करण्यात आलंय. जे लोक सोशल मीडिया वापरतच नाहीत त्यांनाही निराशा, भय या भावनांनी ग्रासलं आहे, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.

सोशल मीडियावरून समाजमनाचा उलगडा होतो ?

‘ट्विटर’ युझर्सपैकी सरासरी 19 हजार लोक त्या क्षणाला त्यांच्या मनात काय चाललंय याबदद्ल ट्विट करतात. त्यावरून एकूण समाज म्हणून आपण कसा विचार करतो हे दिसून येतं.

या सगळ्याचं सार काढायचं झालं तर लोक आपण सुखी आहोत की नाही हे वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करत असतात आणि त्यावरूनच समाजाचं स्वास्थ्य समजायला थोडीतरी मदत होऊ शकते, असं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे.

‘सांधेबदल शस्त्रक्रिया’ मोहीम

 

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment