महाराष्ट्रात १७ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. ह्या निवडणुका भाग १ आणि भाग २ अश्या घेण्यात आल्या. या संपूर्ण निवडणूकीचे सखोल विश्लेषण केल्यास काही महत्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत.

२०१९ निवडणूक
२०१९ निवडणूक

१. संपूर्ण मतदान :- मागील निवडणुकीपेक्षा नांदेड लोकसभेमध्ये सर्वात जास्त म्हणजे ५.२३ टक्क्यांनी जास्त मतदान झाले. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकलेली ही एकमेव जागा आहे.  गोंदिया लोकसभेत मागील निवडणुकीपेक्षा ४.१४ टक्क्यांनी मतदान कमी झाले. मागील निवडणुकीपेक्षा सर्वांत कमी मतदान होणारी ही लोकसभा आहे.

२. नांदेड ही एकमेव जागा आहे जिथे नवीन मतदार नोंदणी सर्वात कमी म्हणजे १.८७% झाली आहे. याचाच अर्थ ९% (77000) अधिक मतदारांनी यावेळी मतदान केले, ज्यांनी मागील निवडणुकीत मतदान करणे टाळले होते. हाच तो फरक आहे ज्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण ८१००० मतांनी जिंकले होते.

३. नांदेड वगळता, सर्व मतदार संघात नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. नवीन नोंदणी ८ ते १५% नी वाढली आहे. रामटेकमध्ये सर्वाधिक म्हणजेच १५% तर नागपूर मतदारसंघात १४% नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment