२७ जुलै रोजी एकविसाव्या शतकातलं सर्वात दीर्घ ग्रहण !

योग तब्बल १०४ वर्षांनी

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, ह्या महिन्यामध्ये, म्हणजे २७ जुलै रोजी होणार असलेले खग्रास चंद्रग्रहण एकविसाव्या शतकातील सर्वात दीर्घ काळ चालणार असलेल्या ग्रहणांपैकी आहे. त्यामुळे हे ग्रहण आणि ह्या काळाच्या दरम्यान घडणाऱ्या बदलांचे निरीक्षण करण्यास खगोलशास्त्रज्ञ एकीकडे उत्सुक असतानाच, काही ज्योतिषांनी मात्र हे ग्रहण लाभकारी नसल्याची भविष्यवाणी केली आहे. आषाढ पौर्णिमेला, २७ जुलैच्या रात्री खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. चंद्र ग्रहण सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतचा अवधी सुमारे चार तासांचा असणार आहे. हे ग्रहण भारतामध्ये सगळीकडे दिसणार आहे. इतके दीर्घ काल चालणारे चंद्र ग्रहण पाहण्याचा योग तब्बल १०४ वर्षांनी आला असल्याचे म्हटले जात आहे.

सर्वात दीर्घ ग्रहण

हे ग्रहण २७ जुलैच्य रात्री ११.४५ ला पूर्ण लागणार असून, ह्याची समाप्ती पहाटे २. ४५ च्या सुमारास होणार असल्याचे समजते. ह्या ग्रहणाच्या प्रभावाने विनाशकारी नैसर्गिक आपदा येण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी ज्योतिषांच्या वतीने केली जात आहे. ह्यावेळी भूकंप, सुनामी, ज्वालामुखी विस्फोट अश्या घटना घडू शकतील असे भाकित ज्योतिषांनी केले आहे. २६ जुलै १९५३ साली अश्याच प्रकारे खग्रास चंद्रग्रहण झाले असता, ग्रीसमध्ये भीषण भूकंप आला होता. हे ग्रहण विसाव्या शतकातील सर्वात दीर्घ काल चालणारे होते.

ज्योतिषशास्त्रानुसार, २७ जुलै रोजी होणार असलेल्या खग्रास ग्रहणाचे प्रभाव भारत, बांग्लादेश, म्यानमार, चीन, हवाई द्वीप, मेक्सिको, बहामाज, मुरीतानिया, माली, अल्जिरीया, नायजर, लिबिया, रशिया, सौदी अरेबिया, ओमान आणि संयुक्त अमिरातीतील प्रांतावर होण्याची शक्यता आहे. हे ग्रहण निरनिरळ्या प्रकारच्या भौगोलिक घटनाचे कारक असण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

२१ व्या शतकातले सर्वात अधिक काळ दिसणारे खग्रास चंद्रग्रहण येत्या २७ जुलैला होणार असून ते भारताबरोबरच युरोप, ऑस्ट्रेलिया, द.अमेरिका, आफ्रिका आणि प.आशियात दिसणार आहे. हे ग्रहण तब्बल १ तास ४३ मिनिटे असून या ग्रहणाला संशोधकांनी ब्लड मून असे नाव दिले आहे. यावेळी पावसाळी ढगांनी आकाश व्यापलेले नसेल तर ग्रहणाचा सुंदर नजारा पाहता येणार आहे. ३१ जानेवारी २०१८ ला सुपर ब्लड मून चंद्रग्रहण झाले होते त्यापेक्षा हे ग्रहण ४० मिनिटे अधिक दिसणार आहे.

या ग्रहणात खग्रास स्थिती असूनही चंद्र पूर्ण काळा दिसणार नाही तर तो तांब्याचा रंगाचा दिसेल. म्हणजे लालसर दिसेल. चंद्र्ग्रह्णात पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि तिची सावली चंद्रावर पडते. ब्लड मून मध्ये पृथ्वी चंद्र सूर्याच्या मध्ये आल्यावरही वातावरणातून काही प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचतो चंद्र लालसर दिसतो. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या मागे लपतो तेव्हा तो गडद लालसर होतो.

ज्येष्ठ आणि वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन योजना सुरू

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment