व्यवस्थेचं तहान न भागवणारं पाणी !

आज पुण्या मुंबईसारख्या शहरात खूप जास्त गर्दी वाढती आहे. त्यामुळे अर्थात वाहनं वाढतायत, प्रदूषण वाढतं आहे. याचं मूळ काय आहे ? अशी काय परिस्थिती आली आहे की अक्ख्या महाराष्ट्रातल्या निम्म्याच्यावर माणसांना पुणे आणि मुंबईला यावं वाटतं किंबहुना का यावं लागतं ?

dragon-fly-1391358

पूर्ण महाराष्ट्रात जेवढी जिल्हे आहेत, गावं आहेत तिथं करण्यासारखं काहीच नाही का ? अर्थात एक फरक आहे तो म्हणजे माणसांच्या दृष्टीकोनात. मग तो कोणत्याही बाबतीत असू देत, तुमचं ज्ञान असेल, कला असेल, तुमचं काहीही काम असेल. पण दृष्टीकोन जो काय आहे तो एका दिवसात तयार नसतो होत. त्याला वर्ष लोटावी लागतात. जशी शहरात काही वर्ष लोटून मग लोकांचा एक दृष्टीकोन तयार झाला आहे तसाच सगळीकडे निश्चितच तयार होऊ शकतो. पण त्याला अर्थात वेळ जाणार. बदल हा होणारच. निसर्गाचा नियम आहे तो.

आपण जे काही शिकलो आहे ते एका ठराविक ठिकाणीच वापरता येणं कितपत योग्य आहे बरं ? मला तर अजिबात पटत नाहीये. मी किंवा असे बरेच जण आहेत जे काही शिकलो आहेत ते एका ठराविक शहरातच वापरता येण्यासारखं आहे. हे शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने पूर्णपणे फेल गेलेलं आहे. जेव्हा केव्हा कोणीही त्याच्या मूळ गावी जायचा विचार करतो तेव्हा विचार करतो की तिकडं जाऊन करायचं काय ? असा विचार करायला भाग पाडणं हेच या व्यवस्थेच्यामागचा विचार असावा.

विद्येचं माहेरघर, इथंच सगळं काही आहे असं अजिबात काही नसतं आणि नाहीसुद्धा. ही जी व्यवस्था आणि तसं मार्केटिंग होत आलं आहे, याच गोष्टी आज कुठे न कुठे शहरातली राहण्यासाठीची कमी होत जाणारी जागा, गाड्यांची गर्दी, होणारं प्रदूषण या सगळ्यालाच कारणीभूत आहे. पूर्णपणे नसेल पण कुठे न कुठेतरी आहेच. ही जी व्यवस्था आहे, तिला जर छेद द्यायचा असेल तर तो विचार आणि धाडस करायचं असेल तर ते तुम्हालाच करावं लागणार आहे. तुमच्या शहरात संधी निर्माण करणं हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला ती सुरुवात करावी लागेल. म्हणजे मग तुमच्या पुढची पिढी जी आहे ती जरातरी समाधानात जगेल. होऊन होऊन काय होईल ? जरा Laxuary कमी असेल. मी तर म्हणतो या व्यवस्थेनीच ती तुम्हाला सवय लावलीय. जेणेकरून तुम्ही त्या व्यवस्थेचे बळी व्हाल. जेवढी तुमची तहान वाढवाल तेवढी तुम्हाला विहीर खोदावी लागणार आहे आणि जर गरजाच वाढवायच्या असतील तर मग त्यावर काही उपाय नाही ! पण एक मात्र खरं आहे. या व्यवस्थेचं पाणी जे आहे, ते तुमची तहान अजिबात भागवणार नाही.

  • योगेश विद्यासागर.
Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment