नव्या कंपनीसाठी अॅमेझॉन, वॉरेन बफे व जेपी मॉर्गन हे मराठी माणसाला नियुक्त करणार !

मराठी माणूस कशातच कमी नाही आहे, हे आपण कित्येकदा बघत असतो, वाचत असतो, ऐकत असतो. पण काही घटना अशा घडतात की त्या घटना तुम्हाला या वाक्याचं खरं उदाहरण समोरच दाखवतात. असंच मराठी माणसाला अभिमान वाटण्यासारखं एक काही घडलं आहे.

बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे.पी. मॉर्गन चेस या जगातील तीन आघाडीच्या कंपन्या एकत्र येऊन नवीन आरोग्य कंपनी सुरु करणार आहेत. या कंपनीच्या प्रमुखपदी त्यांनी अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे. अतुल गावंडे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापक असून आरोग्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी नेहमीच टीका केली आहे.

आता ही कंपनी म्हटल्यावर अर्थात ती नफा मिळवण्यासाठी असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीच नाहीये. या कंपनीचं अमेरिकेत बॉस्टन शहरात कार्यालय असेल. या कंपनीच्या स्थापनेमागे खोऱ्याने नफा कमावण्याचा उद्देश नाही असे तिन्ही कंपन्यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे. आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश आहे.

कोण आहेत अतुल गावंडे ?

पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे स्वत: उत्तम लेखक आहेत. ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करतातत. एंडोक्राईन शस्त्रक्रियेचे ते तज्ञ आहेत. हार्वड टीएच चान स्कूल, हार्वड मेडिकल स्कूलमध्ये ते प्राध्यापक आहेत. बिंग मॉर्टल : मेडिसीन अँड व्हॉट मॅटर्स इन द एन्ड हे २०१४ मध्ये त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते.

प्रमुख म्हणून अतुलची आम्ही निवड केली असून तो त्याची जबाबदारी उत्तमपरीने निभावेल यावर मला, जामी आणि जेफला पूर्ण विश्वास आहे असे बफे यांनी सांगितले. अमेरिकेत आरोग्य सेवेचा खर्च उद्योगांवर भारी पडत आहे असे बफे यांनी सांगितले. कमी किंमतीत आरोग्य सेवा देण्याचा हेतू असल्यामुळे कंपनी यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही असे बफे म्हणाले. बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन या तिन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

खासगी शाळातील शिक्षक भरतीसुद्धा राज्य सरकार करणार !

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment

1 COMMENT