बुधवारी राष्ट्रीय राजधानीच्या भाजप मुख्यालयात भाजपचे खासदार जीवीएल नरसिंह राव यांच्यावर बुटाने हल्ला करण्यात आला. आरोपी शक्ती भार्गवा  व्यवसायाने सर्जन आहे.

बूट फेकण्यामागचे कारण अद्याप कळले नाही परंतु खासदार जीवीएल नरसिंह राव यांनी संपूर्ण काँग्रेसला दोष दिला आहे.

” हे काँग्रेसचे एक निंदनीय कृत्य आहे. अश्याप्रकाराची मानसिकता असलेला आणि कॉंग्रेस

ची प्रेरणा असलेला हा दुसरा व्यक्ती आहे.” हल्ला झाल्यानंतर राव बोलले.

त्या व्यक्तीला ताबडतोब पक्षाच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाकडून बाहेर काढण्यात आले आणि त्याला पोलिसांना सोपविण्यात आले. व्यवसायाने डॉक्टर म्हणून ओळखल्या गेलेल्या शक्ती भार्गवाने बूट का फेकला  अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेच्या वेळी भाजपा नेते भुपेन्द्र यादव आणि राव हे भाजप प्रवाक्त्यांशी संवाद साधत होते. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरचे ‘खोटे खटले ‘ फेटाळून  बदनाम करण्यार्या काँग्रेसवर त्यांनी हल्ला केला होता.

Use your ← → (arrow) keys to browse

Leave a comment